पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाजनादेश सभेसाठीच्या सभामंडपाचे काम प्रगतीपथावर...
19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पंचवटीतसाधुग्राम येथील सभेसाठीचे व्यासपीठ व सभामंडपाचे काम वेगाने चालू असून त्याचाआढावा घेण्यात आला. यावेळी प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे,संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, स्थायी समिती सभापती उध्दव निमसे,हिमगौरी आडके, शरद मोरे, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, शिवाजी गांगुर्डे, अविनाशपाटील, शाम पिंपरकर, सुनिल फरताळे, धनंजय पुजारी, दामोदर मानकर, सचिन ठाकरे, सुरेशअण्णा पाटील आदी उपस्थित होते. पाहणी नंतर आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या. दरम्यान दि.18 रोजी होणाऱ्या महाजनादेश यात्रेची तयारी वेगाने चालू असून यायात्रेसाठी मंडल निहाय व विधानसभा क्षेत्र निहाय नियोजन बैठका पार पडल्या. समन्वय समिती, प्रमुख चौक स्वागतसमिती, व्यासपीठ समिती, रॅली / वाहन नियोजन समिती, प्रसिध्दी समिती, शहर सजावटसमिती आदी समित्याच्याआढावा बैठका दररोज पार पडत असून महाजनादेश यात्रेसाठी सुसुत्र नियोजन बध्द पध्दतीनेपार पाडावे यासाठी विविध कामे मार्गी लावण्यासाठी नाना शिलेदार, उत्तम उगले, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक कार्यालयात अथकपणे काम करित आहेत त्याच प्रमाणे अजिंक्य साने,प्रथमेश गिते, अमित घुगे व असंख्य कायकर्ते शहर सजावटीसाठी परिश्रम घेत आहेत. तसेचमंडल निहाय नाशिकरोड मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत, व्दारका मंडल अध्यक्ष सुरेश मानकर, पंचवटी मंडल अध्यक्षचंद्रशेखर पंचाक्षरी, मध्य-पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, सिडको मंडल अध्यक्ष बाळासाहेबपाटील, सातपूर मंडल अध्यक्ष शशिकांत जाधव दि.18 रोजी होणाऱ्या महाजनादेश यात्रा अभुतपर्वव ऐतिहासिक व्हावी यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, ज्येष्ठनेते विजयसाने, आ.बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे यांच्यासह व त्याचे कार्यकर्तेहीमहाजनादेश यात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. सोशल मिडीयाचे प्रदेश संयोजक प्रविण अलई, योगेश चौधरी व त्याचे टिममधील सदस्यसामाजिक प्रसार माध्यमाच्याव्दारे महाजनादेश यात्रेचे प्रसारण व जनजागृती करीत आहेत.