'त्या' टॅक्सी चालकाला अटक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गुरुवारी दादर स्थानकावर एका टॅक्सी चालकाने गैरवर्तवणूक केले. याप्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेत त्या टॅक्सी चालकाला अटक केली आहे. या टॅक्सी चालकाचे नाव कुलजीतसिंह मल्होत्रा असे आहे. त्याचबरोबर विनातिकीट रेल्वे स्थानकावर आल्यामुळे या टॅक्सी चालकाला कारवाईदरम्यान २६ रुपयांचा दंड भरावा लागला. या टॅक्सी चालाकाकडे परवाना नव्हता, याशिवाय त्याने युनिफॉर्मही परिधान केलेले नव्हते. त्यामुळे माटुंगा वाहतूक पोलिसांनी त्याला ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कायद्याअंतर्गत टॅक्सी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले. सध्या त्याची रवानगी आरपीएफ कोठडीत करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.