मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुष्काळी लातुरात मनपाकडे गणेश विसर्जन, पाणी नाहीच तर पाण्यात विसर्जन नाहीच

यंदा लातुरात पाण्याची भीषण टंचाई आहे. ही टंचाई लक्षात घेऊन गणेशाचं विसर्जन नैसर्गिक स्रोतात करु नये लहान गणपतींसाठी हौद बांधावेत आणि मोठे गणपती प्रशासनाकडे द्यावेत किंवा पुढच्या वर्षासाठी सांभाळून ठेवावेत असे आवाहन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आझाद चौकातील भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळ, नगरसेवक राजा मनियार यांनी पुढाकार घेत तात्पुरता हौद बांधला, त्यात नागरिकांनी विसर्जन केले.
 
महापालिकेच्या वतीने गणपती मूर्ती एकत्रित केल्या जात आहेत. गणेश भक्तांनीही मूर्ती पाण्यात विसर्जित न करता एकमेकांना भेट म्हणून देणे किंवा महापालिकेकडे जमा (Latur Ganpati Visarjan) करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे निसर्गाचा समतोलही राखला जाणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आवाहनाला गणेश भक्तांनी प्रतिसाद दिलाय.
 
महापालिकेने दान करण्यासाठी येणाऱ्या गणपती मूर्तींच्या संकलनासाठी संकलन केंद्र देखील स्थापन केली आहेत.   विसर्जित न करता मूर्ती संकलनाचं प्रशासनाने आवाहन केले होते.  अनेक दिवसांपासून लातूर जिल्हा तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहे. त्यातच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठीही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने नाईलाजाने मूर्ती जमा करावी लागली.