गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

परळचा राजा अडकला पुलाखाली, उंची मुळे निर्माण झाला अडथळा

पूर्ण राज्यात मुंबई येथील गणेश विसर्जन पाहण्यासारखे असते, कारण मुंबईतील गणेश मूर्ती या अतिशय भव्य स्वरूपापतील असतात. मात्र उंचीचा थोडा त्रास परळच्या राजाला झाला आहे.

विष्णूरुपात असलेल्या या गणेशमुर्ती एका उड्डाणपुलाखालून जात असताना अडकली. ही मुर्ती शेषनागावर विराजमान आहे. हीच शेषनागाची रचना अडथळा ठरली. लालबाग येथील  पुलाखाली हा राजा अडकला असून,  त्याला काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या अडथळ्यानंतर मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचाही विचार पुढे आला आहे. मूर्तीची उंची लक्षात घेऊन त्यासाठी सोयीचा असा मार्ग निवडण्याचीही शक्यता आहे.

मूर्तीला कोणताही धक्का होऊ नये म्हणून मंडळाचे कार्यकर्ते अटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र  जवळपास 10 मिनिटं परळच्या राजाची मूर्ती लालबाग उड्डाणपुलाखाली अडकली. होती, मूर्तीची उंची 23 फुटांपेक्षा अधिक होती. त्यामुळेच पुलाखालून जाण्यास अडचण आली. अखेर गणेशभक्तांच्या अथक प्रयत्नानंतर मूर्तीची दिशा बदलण्यात यश आले आणि मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली आहे.