शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत महिलेसमोर अश्लील कृत्य करणार्‍या ऑटो ड्राइव्हरला अटक

मुंबईत एका ऑटो ड्राइव्हरला मालवणीमध्ये एका महिलेसमोर अश्लील कृत्य करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीची ओळख 32 वर्षीय मोहमम्द शकील अब्दुल कदार मेमन या रूपात झाली असून तो पश्चिमी मलाडच्या मालवणी येथील रहिवासी आहे. अधिकार्‍यांप्रमाणे त्याने अनेक महिलांचे शोषण केले आहे. 
 
पोलिसांप्रमाणे ही घटना 1 सप्टेंबर रात्री 11.30 च्या सुमारास घडली जेव्हा 20 वर्षीय महिला लिंक रोड स्थित चिंचोली बंदरच्या बस स्टँडवर उभी होती. मेमनने महिलेसमोर आपला ऑटो उभा करून महिलेला ऑटोत बसण्याचा आग्रह केला परंतू तिने नकार दिला. नंतर त्याने आपली पँट काढून आपला प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला.
 
पोलिसाने सांगितले की महिलेने आपल्या आईला बोलावले आणि घटनेबद्दल माहिती दिली. तो तेथून जाण्याऐवजी महिलेसमोर हस्तमैथुन करू लागला. नंतर महिलेने तक्रार केली तर तो ऑटो तेथेच सोडून पळाला. पीडिता आणि त्यांच्या आईने पोलिस स्टेशन जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
 
पोलिसांनी शोध घेत मेमनला अटक केली असून पुढील कारवाईसाठी त्याला बांगर नगर पोलिस स्टेशनाच्या ताब्यात दिले आहे.