शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे आज आंदोलन
आज शासकीय आणि पालिका रुग्णालयातील डॉक्टरांकडून आंदोलन केले जात असून रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना फटका बसणार आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स तसेच इंटर्न डॉक्टर्स देखील निदर्शने करणार आहेत. याबद्दल सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या खासजी डॉक्टरांच्या संस्थेकडून देशभरातील विविध राज्यातील रुग्णालयाती डॉक्टर्स आंदोलन पुकारणार आहे. फक्त आपत्कालीन विभाग सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यात मार्डचे साडे चार हजार डॉक्टर्स तर ASMI चे अडीच हजार डॉक्टर्स आंदोलन करणार असल्यामुळे रुग्णांवर मोठा परिणाम होणार आहे. कोलकत्यातील ज्युनिअर डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या मारहाण निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे. गेल्या चार दिवसांपासून कोलकातामध्ये डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याने संप सुरु आहे.
कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दोन डॉक्टरांना मारहाण केली. जवळजवळ 200 लोकांनी रुग्णालयावर हल्ला केला होता. यामध्ये दोन ज्युनिअर डॉक्टर्स गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना MARD आणि इंटर्न डॉक्टर संघटना ASMI यांनी या घटनेचा तीव्र निषेध दर्शवत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.