मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पावसाचा जोर वाढणार, पुणे वेधशाळेचा अंदाज

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २६ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण आणि गोव्यात पुढील चार ते पाच दिवसात अतिवृष्टी होईल. तसेच तर येत्या ४८ तासात मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. रत्नागिरी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.
 
दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह दक्षिण रत्नागिरीसह गुहागर, लांजा, राजापूर, दापोलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे दक्षिण रत्नागिरीतले जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक, तब्बल २५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात २१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीच्या बाजारपेठांमध्ये पाणी साचलं होतं. मिरजोळे पाटीलवाडी इथं पुलावरून पाणी गेल्याने १६ गावांचा संपर्क तुटला होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.