मार्क कमी पडले म्हणून तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली
मार्क कमी पडल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात मुलगी गंभीर जखमी झाली. पिंपरीतील त्रिवेणीनगर येथील एका शाळेत ही घटना घडली.
या घटनेत सोमवारी शाळेचा ‘ओपन डे’ होता. यावेळी पालकांसमोर विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स सांगितला. मुलीला मागील परीक्षेत कमी मार्क मिळाल्याची माहिती शिक्षकाने सर्वांसमोर तिच्या पालकांना दिली. मार्क कमी पडले म्हणून मुलगी उदास झाली. ‘ओपन डे’चा कार्यक्रम दुपारी अडीचच्या सुमारास झाला. त्यानंतर तिची आई शाळेच्या इमारतीच्या खाली थांबली होती. याचवेळी मुलीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.