शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अखेर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले त्यांच्या दत्तक शहराला मोठे गिफ्ट, देशातील पहिला प्रकल्प

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रोजेक्ट (Nashik metro) लवकरच नाशिकमध्ये सुरु केला जाणार आहे. 2000 कोटी रुपयांच्या या मेगा प्रोजेक्टच्या माध्यमातून शहरातील दोन प्रमुख मार्गांवर टायर बेस मेट्रो धावणार आहे. येत्या चार वर्षात हे काम पूर्ण होईल. राज्यातल्या या पहिल्याच प्रोजेक्टच्या मंजुरीसाठी हा प्रकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प (Nashik metro) आणत विधानसभेच्या तोंडावर भाजपने मास्टरस्ट्रोक मारला असे चित्र उभे केले जाते आहे. मात्र शहरातील इतर मोठ्या अनेक समस्या सोडवल्या पाहिजे असे नागरिक म्हणत आहेत. 
 
नाशिक हे कृषी आणि बागकाम संपन्न औद्यो्गिक शहर तसेच जग प्रसिध्द धार्मिक केंद्र म्हणून प्रस्थापित आहे. सन 2019 मधील नाशिक शहराची अंदाजित लोकसंख्या 2.3 दशलक्ष एवढी असून यामुळे सक्षम अशी सार्वजनिक परिवहन व्यवस्था असणे गरजेचे झाले आहे. परंतु टियर २/३ शहरांमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा प्रचंड खर्च ( रु २५०-४०० कोटी प्रति कि मी ) आणि अल्प प्रवासी संख्या  ( ६०००-१५००० ) विचारात घेता मेट्रोचे बांधकाम आर्थिकदृष्टया व्यवहार्य नसल्यामुळे शासन मागील बऱ्याच कालावधीपासून योग्य अशा परिवहन पर्यायाच्या शोधात होते.
 
आता महाराष्ट्र शासनाने नाशिक शहराकरिता एक प्रभावी, स्वस्त, आणि पर्यावरणपूरक, योग्य अशी परिवहन प्रणाली देण्याचा निश्चय केला आहे आणि जानेवारी २०१९ मध्ये ही जबाबदारी महामेट्रोस सोपविण्यात आली आहे. महामेट्रोने या संदर्भात शक्याशक्यतेचा अभ्यास करुन आपला अहवाल सिडको, नाशिक महानगरपालिका, राज्य शासन इत्यादिस सादर केला आणि संबंधितांशी सल्लामसलत करुन व योग्य ते परिश्रम घेवून याबाबतचा डीपीआर तयार केला. सदर डीपीआर जुले २०१९ अखेरपर्यत राज्य शासनाकडे मंजूरीकरीता सादर करण्यात येईल. महा मेट्रोने यासाठी प्रचलित जागतिक परिवहन प्रणालींचा सखोल अभ्यास केला व अशा प्रकारच्या अल्प प्रवासीसंख्या असलेल्या टियर २/३ शहरांसाठी एक योग्य, आदर्श व अव्दितीय असा पर्याय पुढे आला.
 
 ‘ मेट्रो-निओ ‘ असे संबोधण्यात आलेल्या या नवीन प्रणालीची ठळक वैशिष्ठये अशी आहेत:
 
१.     २५/१८ मीटर वातानूकूलित विजेवर चालणारे कोच ( रबरी टायर/६००-७५० V DC Over Head traction ), २००/३०० प्रवासी क्षमता, गंगापूर-नाशिक रेल्वे स्टेशन (२२ कि मी/ १९ स्थानके ) आणि गंगापूर-मुंबई नाका (१० कि मी/१० स्थानके) या दरम्यान उन्नत मार्गावर धावणार, स्वयंचलित दरवाजे, एकस्तर बोर्डिग (Level Boarding ), आरामदायी आसने , प्रवासी माहिती फलक इत्यादि व्यवस्था.
 
२.     स्थानकांवर जिना, उद्वाहक (Lift) आणि सरकता जिना ( Escalator) राहील. रस्त्यांवर प्रवाशांविषयी माहितीचा डिस्प्ले.
 
३.     खालील दोन मार्गावर बॅटरीचलित फिडर बस सेवा राहील.
 
i)      मुंबई नाका व्हाया गरवारे ते सातपूर कॉलनी (१२ कि मी )
 
ii)     नाशिक स्टेशन ते शिवाजीनगर व्हाया नांदूर नाका (१२ कि मी)
 
सदर बसेस मुख्य कॉरिडॉरवरुन जाताना चार्ज होतील व प्रवास सुकर करतील. याकरिता  
 
स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थेची गरज राहणार नाही.
 
४.     ‘ मेट्रो-निओ ‘ ही एक अव्दितीय संकल्पना असून अशा प्रकारची देशातील प्रथम प्रणाली आहे. ही एक स्वस्त, प्रभावी व पर्यावरणपूरक प्रणाली आहे.
 
५.     मेट्रोच्या किमतीच्या तुलनेत (रु २५०-४०० कोटी प्रति कि मी) या नविन प्रणालीची किंमत अंदाजे फक्त ६० कोटी प्रति किमी असेल.
 
‘मेट्रो-निओ‘ एक अद्यावत अशी प्रणाली असून टियर २/३ शहरातील अल्प प्रवासीसंख्येसाठी सार्वजनिक द्रुतगती परिवहनाचा क्रांतीकारी पर्याय आहे. याची अमंलबजावणी म्हणजे सार्वजनिक द्रुतगती परिवहनाचा भारतातील शहरांकरिताच नव्हे तर जगभरातील अन्य शहरांसाठी सुध्दा स्वस्त असा पर्याय असेल.
 
दि. २२/०७/२०१९ रोजी डॉ. ब्रिजेश दिक्षीत, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, श्री एन.के.सिन्हा, कार्यकारी संचालक, नाशिक मेट्रो प्रकल्प, डॉ. हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक (जनसंपर्क) आणि राईट्स (RITES) चे अधिकारी यांनी नाशिक मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गाची तपासणी केली.