शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आणि 101 रुपयांच्या मनिऑर्डर आणि पत्राने मुख्यमंत्र्यांना भावुक केले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढदिवस साजरा करताना मुख्यमंत्री सहायता निधीत  1 कोटी 75 लाख रुपये जमा झाले.  मात्र यावेळी  101 रुपयांचा आलेला निधी मुख्यमंत्र्यांना भावुक केले.   
 
औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता.गंगापूर) येथील वेदांत भागवत पवार (५)  पित्ताशयाच्या कर्करोगाने पिडीत होता. वेदांतचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते.  या बालकाची आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईल दूरध्वनी माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारासाठी लगेचच एक लाख 90 हजारांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे वेदांतला जीवनदान मिळाले.
 
मुख्यमंत्र्यांच्या या संवदेनशीलता पाहून मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्रीमती रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील 101 रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठविले. तसेच, एका भावनिक मेसेजही त्यांनी दिला आहे. 
 
“आपण माझ्या मोबाईलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातून इतर सामान्यांची घडो यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरुपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवित आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो, या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.” वेदांच्या आत्याने लिहिलेल्या या भावनिक मेसेजमुळे मुख्यमंत्री भावूक झाले