शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गणेश विसर्जन : कमकुवत पुलावर गर्दी करू नका, नाच गाणे करू नका - मुंबई मनपा

गणेश विसर्जनाच्या दिवशी कमकुवत, जर्जर, जुन्या झालेल्या पुलांवर नाचू नका अशी अत्यंत महत्वची सूचना मुंबईत मनपाने सर्वच गणेश मंडळांना केली आहे.
 
मनपाच्या नुसार नाच-गाण्यामुळे व एकाच ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे पुलावर दाब येऊन आणखी नुकसान किंवा दुर्घटना होऊ शकते. सोबत मोठ्या गणेश मंडळांच्या भक्तांनी पुलावर जास्तवेळ थांबुच नये. त्यांनी शांतपणे पुल कोणताही पार करावा अशी सूचना मनपाने लहान मोठ्या सर्व गणेश मंडळांना केली आहे. मुंबईत मागच्या काही काळात पूल कोसळून जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. 
 
येत्या महिण्यात दोन सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, गणेशोत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी त्यांच्या मागण्या, अडचणी समोर ठेवल्या आहेत. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ही मुंबईतील गणेश मंडळांची मुख्य संघटना असून, शहरातील काही पुल बंद केल्यामुळे विसर्जन मार्गात मोठे बदल केले आहेत. तीच आमची मुख्य चिंता आहे. त्यामुळे आता या नवीन मार्गावर सरकारने सुरक्षा द्यावी सोबतच सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी सरकारकडे केली आहे.