शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एका विषयवार एकमत, वाचा कोणते प्रकरण

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज्यातील राजकारणातील मोठी नाव आहेत. मात्र  दोघे बंधू हे एकमेकांच्या विरोधात राजकारण करतात. मात्र त्यांच्या नंतरची ठाकरे पीढी देखील राजकारणात सक्रिय आहे. त्यात आता अमित आणि आदित्य या दोन्ही भावांचे एका विषयावर एकमत झाले असून दोघेही त्यासाठी आंदोलन करत आहेत.
 
मुंबई येथे मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडं तोडण्याचा  निर्णय घेतला असून, मात्र  या निर्णयाला विरोध करण्यासाठी ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू झाली आहे. यासाठ मुंबईतील सामाजिक संस्थांनी आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सहभाग नोंदवला आहे. मात्र या निमित्ताने का होईना ठाकरेंच्या पुढील पिढीत युती झाली आहे.
 
यापूर्वी आरेतील वृक्षतोड थांबवण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार विरोध दर्शवला असून,  सोबतच अमित ठाकरेंनी एका व्हिडीओद्वारे मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोड करु नये असे आवाहन केलं आहे. प्रशासनला केलं .
 
तर आरे  वाचवा या मोहीमेसाठी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सामाजिक संस्था, कॉलेजचे विद्यार्थी, स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते. या सर्वांना पोस्टर, पथनाट्य अशा विविध माध्यामातून आरेतील वृक्षतोडीस विरोध दर्शवला आहे.
 
आता दोघे ठाकरे सोबत असल्याने आरे येथील वृक्षतोड नक्की थांबेल असे चित्र आहे.