सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (08:45 IST)

100 कोटी वसुली प्रकरण : वसुलीची रक्कम हवालामार्फत देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध 27 कंपन्या वळवल्याचा ED ला संशय

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना ईडीने (ED) सोमवारी मध्यरात्री अटक केली. मात्र ठोस अशी काहीही माहिती समोर आलेली नव्हती. पण आता वसुलीतील रक्कम हवालामार्फत देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध २७ कंपन्यांमध्ये वळवल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे. यातील कंपन्या बहुतांश शेल असून, काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी त्यांचा वापर केल्याचे गृहीत धरून ईडीने तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान या कंपन्यांशी देशमुख यांचा थेट संबंध नसला तरी या कंपन्यांत त्यांच्यामुळे आर्थिक गुंतवणूक झाली आहे. त्या अनुषंगानेही तपास करण्यात येत आहे. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे १३ आणि नातेवाईक, तसेच जवळच्या मित्रांच्या नावे १४ कंपन्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये व्यवसाय नसला तरी त्यांच्या अस्तित्त्वातून काळा पैसा व्यवहारात आणल्याचा संशय ईडीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
 
न्यायाधीश चांदीवाल आयोगा  समोरही या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.२२ ऑक्टोबरच्या सुनावणीत आयपीएस अधिकारी  परमबीर सिंग यांनी मी माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे.आता त्यासंदर्भात मला आणखी काही पुरावे द्यायचे नाहीत, तसेच उलटतपासणीही करायची नाही, असे लेखी कळविले होते.इतकच नाही तर त्यांनी आयोगासमोर साक्षीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी असेही त्यांनी म्हंटले होते.साक्षीसाठी आयोगाने परमबीर सिंग  यांना वेळोवेळी समन्स बजावले होते.हजर न राहिल्याने दंडही ठोठावला होता. मात्र आता चांदीवाल आयोग कोणती भूमिका घेतो.यावर राज्य सरकारने सुरू केलेल्या या चौकशीचे भवितव्य ठरणार आहे.
 
दोन वेगवेगळ्या चौकशा
 अनिल देशमुख  यांची चांदीवाल आयोगाच्या चौकशीसोबतच केंद्रीय तपास यंत्रांकडूनही चौकशी होत आहे.त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर बोलताना ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी सांगितले की, सध्या ते एका प्रकरणात ईडीच्या ताब्यात आहेत.मात्र त्या अटकेचा आणि चांदीवाल आयोगाच्या चौकशीचा एकमेकांशी संबंध नाही.