गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (08:58 IST)

माझ्या भाषणातील आवाजाची तीव्रता कमी होण्याचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांना, नाना पाटेकर यांनी सांगितला फडणवीसांचा एक किस्सा

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांची मागील विधानसभा निवडणुकीतील भाषणं त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे चांगलीच चर्चेत होती. त्यावर अनेक मीम्सही तयार झाले. यावरूनच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी फडणवीसांचा एक किस्सा सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस भाषणात स्वर वरचा लावायचे असं नाना पाटेकरांनी सांगितलं. तसेच तो वरचा स्वर लावू नका असा सल्ला दिल्याचंही नमूद केलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी होकार देत तो किस्सा सांगितला. ते मंगळवारी (११ ऑक्टोबर) लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्या भाषणातील आवाजाची तीव्रता कमी होण्याचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांना जातं. मला जाहिरपणे सगळ्यांना सांगायचं आहे की, विधानसभा निवडणुकीच्या माझ्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा आणि म्हणायचे अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल.”
Edited By - Ratandeep Ranshoor