1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (13:26 IST)

10वी-12वी प्रात्यक्षिक परीक्षा वेळा पत्रक जाहीर

बोर्डाने 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळा पत्रक जाहीर  केले आहे. 12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी पासून सुरु होणार असून 3 मार्च रोजी संपणार. तर 10 वी च्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी सुरु होणार असून 14 मार्च संपणार. काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी च्या लेखी परीक्षेचे वेळा पत्रक बोर्डाने जाहीर केले होते. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत असणार. तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च पर्यंत असणार. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. 

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या सरता वेग पाहता येत्या 24 जानेवारी पासून राज्यातील पहिले बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे. मात्र शाळेत पाठविण्यासाठी पालकांची परवानगी असल्याचे वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

शाळा सुरु करताना कोविड-19 च्या संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.