मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (13:04 IST)

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचे पहाटे निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. त्यांनी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी मराठी पत्रिकेत 50 वर्षाहून अधिक काळ योगदान दिलं. त्यांना कोरोना आणि डेंग्यू झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती.  त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. सकाळी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि त्यांची प्राण ज्योत मालवली. 
 
त्यांना पुढारीकार ग गो जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार,  कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समनव्य संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांनी युवा पत्रकारांना मार्गदर्शन दिले. त्यांच्या निधनाने राज्य पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायकर यांना श्रद्धांजली  वाहिली आहे.