1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 11-year-old boy studying in madrassa commits suicide by hanging in Mumbai

मुंबईत मदरशात शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबईत एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
मुंबईतील मालाड मालवणी येथे ही घटना घडली आहे. या मुलाचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळला.मुलाने बाथरूमच्या दाराला बंद करून गळफास घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. 
 
या घटनेची माहिती मिळतातच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून कोणत्याही प्रकाराची चिठ्ठी सापडली नाही.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

मयत मुलगा मालवणीत राहत असून आपल्या मोठ्या भावासह मालाडजवळील मदरशात शिकायचा शनिवारी संध्याकाळी इतर विद्यार्थी बाहेर खेळायला गेले मात्र हा तिथेच थांबला आणि बाथरूमच्या दाराला बंद करून आतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी टाहो फोडला.मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit
 
पुढील लेख
दोन दहशतवाद्यांना अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला