बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (10:13 IST)

बीएचआरमध्ये ११०० कोटीचा घोटाळा झाला, खडसे यांचा गौप्यस्फोट

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसायटी (बीएचआर) या संस्थेत ११०० कोटीचा घोटाळा झाला असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. या घोटाळ्यात मोठ्या लोकांची नावे आहे. यावेळी त्यांनी संस्थेची पुणे, जळगाव, जामनेर व इतर ठिकाणची मालमत्ता मातीमोल भावात विकल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश २०१८ मध्ये केंद्र सरकारने दिले होते. पण, त्याची चौकशी वरीष्ठ पातळीवर दडपण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 
बीएसआर संस्थेवर दोन दिवसापूर्वीच पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ जणांच्या पथकाने एकाच वेळी छापे टाकले. त्यानंतर अपहार, गुंतवणूकदारांची थकीत न देणे व संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे प्रकरणी गुन्हा दाखल करुन कागदपत्र ताब्यात घेतले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जळगाव येथे माजी मंत्री एकनाथ खडसे व अॅड. किर्ती पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सविस्तर माहिती दिली. पोलिस याची संपूर्ण चौकशी करत आहे. त्यातून मोठी नावे बाहेर येतील असेही त्यांनी सांगितले. ठेवीदाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करु, या प्रकरणात अनेकांनी हात धुऊन घेतल्याचे त्यांनी सांगितले.