सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (15:10 IST)

मंगळ कार्यात पंच देवाच्या पूजेचे महत्त्व

हिंदू धर्माच्या प्रत्येक मंगळ कार्यात किंवा पूजेत पंचदेवाच्या पूजेचे नियम आहे. त्याशिवाय पूजेची पूर्णता नसते. या पंच देवाची पूजा केल्यास सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात. पंचदेव कोण आहेत आणि त्यांची पूजा कशी केली जाते जाणून घेऊ या.
 
पंचदेव आणि त्यांचे क्रम - ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश आणि सूर्य. काही ठिकाणी ब्रह्माऐवजी दुर्गा देवीला स्थान दिलं जातं. विष्णू, महादेव, गणपती, सूर्य आणि शक्ती. काही ठिकाणी सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू या क्रमाने पूजा केली जाते. 
 
मान्यतेनुसार पंच देवात सूर्याची उपासना पहिले करतात. नंतर काळानुसार पंच देवांचे क्रम बदलत गेले आणि आता सर्वात पहिले गणपती पूजनीय झाले. पण 
 
शास्त्र असं सांगत की - 
रविर्विनायकश्चण्डी ईशो विष्णुस्तथैव च
अनुक्रमेण पूज्यन्ते व्युत्क्रमे तु महद् भयम्
 
अर्थ - उपासकाने प्रथम पंच देवांमध्ये भगवान सूर्य, त्यानंतर श्री गणेश, आई दुर्गा, भगवान शंकर आणि भगवान विष्णूंना पूजावे.
 
विद्वानांचा युक्तिवाद: विद्वानांच्या तर्कानुसार गणेश पाण्याचे घटक मानले गेले आहे. यांचे वास्तव्य पाण्यातच मानले आहे. श्री विष्णू हे वायू घटक आहे. 
 
शिव-पृथ्वीचे घटक आहे. श्री देवी अग्नि घटक आहेत आणि श्री सूर्य आकाश घटक मानले गेले आहे. सूर्याला जगाचा आत्मा म्हटलं आहे. परंतु आपल्या जीवनासाठी पहिली आवश्यकता पाण्याची असते. म्हणून प्रथम उपासक श्री गणेश मानले आहेत जे पाण्याचे देव आहे.
 
पंचदेव पूजा- प्रत्येक देवांचे स्वतःचे मंत्र असतात ज्याद्वारे त्यांचे आवाहन केले जाते. ज्या देवतांची उपासना केली जाते त्यापूर्वी पंचदेवांची पूजा करणं आवश्यक आहे. आंघोळ झाल्यावर देवांना पत्री, फुल, धूप इत्यादी अर्पण करतात. प्रत्येक वस्तू अर्पित करताना वैदिक मंत्र निश्चित असतो. 
 
आदित्यं गणनाथं च देवी रुद्रं च केशवम्‌
पंच दैवत्यामि त्युक्तं सर्वकर्मसु पूजयेत
 
अर्थ - सूर्य, गणेश, दुर्गा, शिव, विष्णू यांना पंचदेव म्हणतात. यांची पूजा सर्व कार्यात करायला पाहिजे.
 
पंचदेव पूजेची विधी - पंचदेव पूजेसाठी सर्वप्रथम देवांचे स्मरण करावे नंतर पूजा करावी.
 
श्री विष्णूंचे ध्यान- 
उद्यत्कोटिदिवाकराभमनिशं शंख गदां पंकजं
चक्रं बिभ्रतमिन्दिरावसुमतीसंशोभिपार्श्वद्वयम्‌
 
कोटीरांगदहारकुण्डलधरं पीताम्बरं कौस्तुभै-
र्दीप्तं श्विधरं स्ववक्षसि लसच्छीवत्सचिह्रं भजे
 
ॐ श्री विष्णवे नमः,ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ।
ॐ विष्णवे नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि।
 
शिवाचे ध्यान-
ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारूचंद्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌ 
 
पद्मासीनं समन्तात्‌ स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानंविश्वाद्यं विश्वबीजं निखिलभय हरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌ 
 
ॐ नमः शिवाय, ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ।
ॐ नमः शिवाय, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं स्नानं समर्पयामि।
 
श्रीगणेशाचे ध्यान -
खर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं
प्रस्यन्दन्मदगन्धलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलम्‌ ।
 
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं
वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्‌ ।।
 
ॐ श्री गणेशाय नमः, ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ।
ॐ श्री गणेशाय नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि।
 
भगवान सूर्याचे ध्यान- 
रक्ताम्बुजासनमशेषगुणैकसिन्धुं
भानुं समस्तजगतामधिपं भजामि।
 
पद्मद्वयाभयवरान्‌ दधतं कराब्जै-
र्माणिक्यमौलिमरुणांगरुचिं त्रिनेत्रम्‌
 
ॐ श्री सूर्याय नमः, ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समपर्यामि ।
ॐ श्री सूर्याय नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि ।
 
देवी दुर्गाचे ध्यान-
सिंहस्था शशिशेखरा मरकतप्रख्यैश्चतुर्भिर्भुजैः
शंख चक्रधनुः शरांश्च दधती नेत्रैस्त्रिभिः शोभिता ।
 
आमुक्तांगदहारकंकणरणत्काञ्चीरणन्नूपुरा
दुर्गा दुर्गतिहारिणी भवतु नो रत्नोल्लसत्कुण्डला ।।
 
ॐ श्री दुर्गायै नमः, ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समपर्यामि ।
ॐ श्री दुर्गायै नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि।