शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (16:13 IST)

साताऱ्यात दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र थैमान मांडले आहे.दररोज दरड कोसळण्याच्या बातम्या येत आहे.आज महाडच्या तळीये गावात दरड कोसळल्याच्या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येत असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळून या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरु केले आहे.ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असल्याचे वृत्त समजत आहे.घटनेची माहिती मिळतातच काही ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहचून आवश्यक मदत करीत आहे. मृतदेह काढण्याचे कार्य अद्याप सुरु आहे. 
या अपघातात तीन कुटुंबातील काही लोक रात्री पासून बेपत्ता असल्याचे समजले आहे. त्यांच्या शोध कार्य अद्याप सुरु आहे.