बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अबब, चक्क 12 हजार रुपये प्रती किलोची सुवर्ण मिठाई

ठाण्यातील एका मिठाई दुकानात चक्क 12 हजार रुपये प्रती किलोने सुवर्ण मिठाई विक्रीसाठी उपलब्ध आहे.
 
ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नर मिठाई सेंटरमध्ये ही सोन्याची मिठाई मिळत आहे. या मिठाईचा दर 12 हजार रुपये प्रती किलो असून, अस्सल सुका मेवा आणि त्यावर सोन्याचा वर्ख असं या मिठाईचं स्वरुप आहे. ही सोन्याची मिठाई तितक्याच उंची आणि सुंदर मिठाई बॉक्समध्ये बांधून दिली जात आहे.सध्या ही मिठाई  बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.