गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (10:13 IST)

ठाण्यात डॉक्टरकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

ठाणे: ठाण्यात डॉक्टरने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. 21 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर डॉक्टरला अटक करण्यात आली असून संबंधित रूग्णालयाला टाळे ठोकण्यात आले. प्रतीक तांबे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायलयात हजर करण्यात आले होते.
 
त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले. पीडित महिला सरोगेट मदर असून ती ठाण्याच्या नौपाडा परिसरातील निर्मिती रूग्णालयात आली होती.
 
यावेळी तांबे याने वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. आरडाओरड केल्यानंतर तोंड दाबून अत्याचार सुरूच ठेवला, असे तक्रारीत महिलेने नमूद केले आहे.