1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (14:37 IST)

उद्यापासून बारावीची परीक्षा; नवीन नियमलागू

students
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीच्या परीक्षेलाउद्यापासून सुरुवात होत आहे. 

परीक्षा बुधवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार, दिनांक 19 मार्च 2024 पर्यंत असणार .या परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3320 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित  करण्यात आली आहे

यंदा परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे अधिकची वेळ देण्यात आली आहे. 
इयता १२वी ची परीक्षाची आवेदन पत्र ऑनलाईन स्वीकारले गेले आहे. विषयार्थ्यांचवरील परीक्षेचे नातं कमी होण्यासाठी वेळापत्रक करण्यात करण्यात आले असून वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणे करून परीक्षेच्या ताणाखाली येऊन विद्यार्थी नैराश्यात जाऊ नये. परीक्षा केंद्रावर जीपीएस प्रणाली सुरु केली आहे. परीक्षेचं अर्धातास आधी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे हॉल तिकिटात नमूद केले आहे. 
 
परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनागणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी फक्त कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहे. राज्य मंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
 
Edited by - Priya Dixit