शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2024 (15:41 IST)

SSC-HSC Exam : दहावी-बारावी प्रात्यक्षिक परीक्षे संदर्भात महत्त्वाचा बदल!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचे परिपत्रकराज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. 

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी- मार्च मध्ये होणार असून प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनचे गुण भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड या दुव्याद्वारे लॉग इनचा वापर करून शाळा, कनिष्ठ महविष्यालय ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करणार. 
 
विद्यार्थ्याने प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये दिली असून ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा लेखी परीक्षा नंतर राज्य मंडळाने कळवलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येणार आहे.
नियमित कालावधीमध्ये गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालये, शाळांना उपलब्ध करून  देणार तसेच या विद्यार्थ्यांचे गुण देखील ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे लागणार. अधिक माहितीसाठी  http://www.mahahssboard.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी. 
 
Edited by - Priya Dixit