गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (12:49 IST)

12 वी च्या विद्यार्थ्यांना आज मिळणार हॉल तिकीट

maharashatra board
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र स्टेटबोर्डाच्या विद्यार्थ्यांना आज पासून हॉल तिकीट मिळणार अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजे पासून www.mahahssscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध असेल तसेच कॉलेज लॉगिन मधून देखील हे प्रवेश पत्र उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिका आणि स्वाक्षरी करून घ्यावी. या हॉलतिकिटांमध्ये काही त्रुटी किंवा दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करायचा आहे. हॉल तिकिटात फोटो, स्वाक्षरी विद्यार्थ्यांचे नाव इत्यादी मध्ये त्रुटी किंवा दुरूस्ती असल्यास उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे तातडीनं पाठवायची अशी सूचना बोर्डाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र गहाण झाल्यावर संबंधित  उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनी पुन्हा प्रत काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असे नमूद करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. 
 
Edited By- Priya Dixit