गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (08:05 IST)

दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोरील शिवाजी रस्ता सकाळी सहा वाजेपासून पूर्णपणे बंद

dagdusheth halwai ganpati pune
गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) निमित्ताने पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील (Dagdusheth Halwai Ganpati Temple) रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. गणेश जयंतीच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून उद्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोरील शिवाजी रस्ता उद्या सकाळी सहा वाजेपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या रस्त्याने सोडलं जाणार आहे. जड वाहतूक, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे.

दगडूशेठ हलवाई मंदिराचं डेकोरेश आणि भाविकांची होणारी गर्दी हे खरंतर पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिराचं समीकरणच आहे. प्रत्येक सणाला दगडूशेठ हलवाई मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. सजावटीचं काम सुरु झालेलं आहे. पण शिवाजी रस्ता भाविकांसाठी बंद असणार आहे. जोपर्यंत गर्दी कमी होत नाही तोपर्यंत शिवाजी रस्ता बंद असणार आहे.
 
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील शिवाजी रस्ता सकाळपासून गर्दी संपेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलीय.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor