1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified बुधवार, 18 जानेवारी 2023 (20:24 IST)

मंगळग्रह मंदिरात गणेश जयंतीला गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठा

ganesh jayanti
येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळग्रह मंदिरात गणेश जयंतीला (दि.25 जानेवारी) श्री गणेशाच्या चार अभिषेक मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्त्ताने विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. अभिषेकासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने पंचधातूच्या चार गणेश मूर्ती उत्तर प्रदेशातील ममुराबाद येथून आणल्या आहेत. या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत होईल .जिल्हाधिकारी अमन मित्तल, बेटी बचाव बेटी पढाव चे प्रमुख डॉ. राजेंद्र फडके, दाल परिवार ग्रुपचे प्रमुख प्रेम कोकटा, माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील हे या पूजेचे मानकरी आहेत.