गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (09:50 IST)

बकऱ्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळीच्या इस्लामपुरा भागात बकऱ्याच्या हल्ल्यात एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना  घडली आहे. शिरताज अली शेख हा तेरा वर्षाचा मुलगा आपल्या घराबाहेर खेळत असताना त्याला रस्त्यावर मोकाट सोडलेल्या एका बकऱ्याने धडक दिली आणि तो जमिनीवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्याच्या वडिलांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्याची परिस्थिती आणखीन खालावत गेल्यामुळे त्याला सायन रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
शिरताज हा उत्तरप्रदेशातून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईत आपल्या आई-वडिलांकडे आला होता. परंतु, घराबाहेर खेळत असताना रस्त्यावर मोकाट सोडलेल्या बकऱ्याच्या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान संबंधित मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिरताजच्या कुटुंबीयांनी केली आहे.