शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2017 (12:59 IST)

मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी १४२ विशेष गाड्या सोडणार

मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा तब्बल १४२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटी, एलटीटी, दादर व पुणे ते करमाली, सावंतवाडी, रत्नागिरी दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत.

– ०११८७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी एसी डबलडेकर गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी सुटणार असून रत्नागिरीला दुपारी १ वाजता पोहचणार आहे.तर परतीच्या प्रवासासाठी ०११८८ रत्नागिरी- ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.

– ०१४४५ सीएसटी-करमाली विशेष गाडी (२४फेऱ्या-वन वे) १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून करमाळीला दुपारी २ वाजून ३० मिनिटाने पोहचणार आहे.दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापुर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.