Festival Posters
✕

ऐन सणोत्सवात अहमदनगरमध्ये वीजपुरवठ्यात 2 तासांची कपात सुरु

Updated: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (15:30 IST)
राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसताना नगर मध्ये मात्र वीजपुरवठ्यात 2 तासांची कपात सुरु आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरण कंपनीने शेतीपंपांचा वीजपुरवठा दोन तास कमी केला असून, शेतीपंपाच्या सिंगल फेजवर तब्बल 15 तासांचे भारनियमन सुरू केले आहे. मात्र गावठाण सिंगल फेजचा वीजपुरवठा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.
राज्यात कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील वीजपुरवठ्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने वीज भारनियमन करण्यात येणार नसल्याचे एकीकडे जाहीर केले असले तरी महावितरण कंपनीने प्रत्यक्षात भारनियमन करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार शेतीपंपांना रात्री 10 तास ऐवजी 8 तास तर दिवसा 8 तासांऐवजी 6 तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन त्याची मंगळवार (दि. 12) पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे.
शेतीपंपांना थ्री फेजवर सिंगल फेज वीजपुरवठा करण्यात येत होता. त्यात आता मोठी कपात करण्यात आली असून, या सिंगल फेजसाठी तब्बल 15 तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे.शेतीपंपांच्या सिंगल फेजवर यापुढे केवळ रात्री 9 ते सकाळी 6 वा. पर्यंतच वीजपुरवठा सुरू राहणार असून, सकाळी 6 ते रात्री 9 वा. पर्यंत हा वीजपुरवठा तब्बल 15 तास बंद राहणार आहे.विजेच्या तुटवड्यामुळे वीजकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि गावठाणच्या सिंगल फेजवर नियमित वीजपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान, या वीज कपातीच्या संकटामुळे नगर तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्यातील पाच वाहनांची धडक, मोठा अपघात टळला

अमित शाह मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांची निर्दोष सुटका

महाविद्यालये मराठा विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क आकारू शकणार नाहीत, महाराष्ट्र सरकारने निर्देश दिले

LIVE: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात बदलणारे हवामान

पावसाळी आजारांनंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव: घरच्या घरी पाण्याचे साठे स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेचे नवे मार्गदर्शन

पुढील लेख
Show comments