गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नांदेड , गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (13:08 IST)

डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक

nanded-police-arrest-fake-godman-bhondu-baba-who-cheated-people-for-lakhs-of-rupees
भक्तांना गंडवणाऱ्या स्वत:ला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे सांगून बाबाला नांदेड (Nanded)मध्ये अटक करण्यात आली आहे. गुप्तधन, कुटुंबाच्या भरभराटीसाठी केलेल्या यज्ञात भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करण्यात हा भोंदूबाबा तरबेज होता. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले या भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. 
 
या बाबाने डोंबिवली आणि पुण्यासह अनेक उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर बाबासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबासह तीन जणांना माहूर पोलिसांनी अटक केली आहे.