रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2024 (09:48 IST)

विधवांना टार्गेट करीत 9 वर्षात केली 20 लग्ने, महाराष्ट्रात फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

महाराष्ट्रातील पालघरमध्ये लग्नाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने 2015 पासून आतापर्यंत 20 लग्ने केली आहेत. हा व्यक्ती विधवा आणि घटस्फोटित महिलांना टार्गेट करत असे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पालघर जिल्हा पोलिसांनी एका 43 वर्षीय व्यक्तीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिस अधिकारींनी सांगितले की, या आरोपीवर महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. नाला सोपारा येथील एका महिलेच्या तक्रारीनंतर तपास करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपी फिरोज नियाज शेख याला 23 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून अटक केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिकारी विजय सिंह भागल म्हणाले की, आरोपी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर महिलांशी मैत्री करायचा आणि नंतर लग्न करायचा. लग्नानंतर लाखो रुपयांची रोकड व मौल्यवान ऐवज घेऊन आरोपी पळून जायचा.
 
आरोपीच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेकबुक आणि दागिने जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.