गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 डिसेंबर 2022 (15:54 IST)

विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात, 22 जखमी

accident
परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी येथे विद्यार्थ्यांची सहलीची बस आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 22 जण गंभीर जखमी झाले आहे. परभणीच्या गंगाखेड -राणीसावरगाव मार्गावर खंडाळी पाटीजवळ शैक्षणिक सहल घेऊन जाणाऱ्यासंत जनाबाई विद्यालयाची बस चाकूरकडे जात असताना अहमदपूर येथून बुलडाण्याच्या जाणारी  एसटीच्या बसची धडक झाली या अपघातात 22 जण जखमी झाले असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती कळताच  पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.अपघातात 10 ते 15 वर्षाचे 3 विद्यार्थी जखमी झाले आहे. अपघाताचे कारण कळू शकले नाही. पोलीस अपघाताचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit