शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (08:49 IST)

अल्ट्राटेक वसाहतीतील डबक्यात 3 मुले बुडाली? चंद्रपूर येथील घटना

drowning
अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्यात तीन शाळकरी मुळे बुडाल्याच्या संशयावरून गुरुवारी सायंकाळी 6 वाजतापासून शोध मोहीम राबवली. डबक्याजवळ मुलांचे कपडे आढळल्याने संशय बळावला आहे.
अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी समवयस्क अंदाजे १२ वर्षाची तीन मुले सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. अश्यातच सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्याजवळ मुलांचे कपडे आढळून आले. यावरून ही मुले डबक्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेली असावी. खोल पाण्यात गेल्यामुळे ती बुडाली असावी, असा अंदाज घेऊन कंपनी व्यवस्थापन व गडचांदूर पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मात्र, काहीही शोध लागला नाही. अखेर अंधारामुळे शोध मोहीम थांबविली आहे.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor