मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (16:54 IST)

कोल्हापूरला दर्शनाला निघालेल्या ३ भाविकांचा भीषण अपघातात वाटेतच मृत्यू

3 devotees on the way to Kolhapur died in a terrible accident
रायगड जिल्ह्याच्या पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. 
 
विक्रम गोविंद दिंडे (वय 50 वर्ष), नागेश विक्रम दिंडे (वय 26 वर्ष), प्राजक्ता नागेश दिंडे (वय 24 वर्ष) अशी मृतांची नावं आहे. ते एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब कोल्हापूर येथे बाळूमामाच्या यात्रेसाठी कारने निघाले होते. दरम्यान पेण तालुक्यातील सावरसई येथे ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसली.
 
हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आणि तीन जणांना जागीच मृत्यू झाला तर तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.