गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:11 IST)

आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल : रवी राणा

ravi rana
शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगावर टीका होत असताना, अपक्ष आमदार रवी राणा यांनी ठाकरे गट आणि संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
 
संजय राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर गंभीर आरोप केला आहे. यावर बोलताना रवी राणा म्हणाले की, संजय राऊत हे वैतागलेले आहेत. यावर पुढे जास्त काही बोलणार नाही. हिंदुत्वाच्या विचारांवर शिवसेनेचे आमदार जेव्हा एकनाथ शिंदेंबरोबर गेले, तेव्हा राऊतांनी तुम्ही खोके घेतले, असा आरोप केला. पण आता सत्यमेव जयतेचा विजय झाला. निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंचा विचार असलेल्या एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण दिला आहे, असे रवी राणा यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor