3 वर्षाच्या चिमुकल्याचा आगीत होरपळून मृत्यू
धुळ्यात मनाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शिंदखेडा तालुक्यात पडावद गावात घरात कोणी नसताना अचानक झोपडीला लागलेल्या आगीत झोपत असलेल्या एका 3 वर्षाच्या चिमुकल्याचा आगीत होरपळून दुर्देवी अंत झाला. रुपेश कमल पावरा असे या चिमुकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील पडावद गावात एका झोपडीत कमल पावरा हे कुटुंब वास्तव्यास होते. पावरा हे आपल्या पत्नी शारदा आणि दोन मुलांसह राहत होते. काल कमल हे आपल्या पत्नीसह शेतात कामासाठी गेले. घरात त्यांचे दोन्ही मुलं होते. कमल यांचा 3 वर्षाचा चिमुकला मुलगा घरात झोपला होता आणि मोठा मुलगा घराबाहेर खेळत होता.
अचानक झोपडीला आग लागली आणि त्यात कमल यांचा मुलगा रुपेश हा झोपला असल्याने अडकून बसला. अचानक घराला आग लागलेली बघून बाहेर खेळत असलेल्या कमल यांच्या मुलाने ग्रामस्थांनाना दिली. त्यांनी तातडीने घराकडे धाव घेतली. आणि अग्निशमन दलाला बोलावले. त्यांनीआगीवर नियंत्रण मिळवले. पण आग क्षणातच पसरली होती आणि पाहता पाहता सर्व काही अग्नीच्या भक्ष्यस्थानी गेले. कमल देखील घटनास्थळी धावत आले आणि त्यांनी घरात रुपेश झोपलेला असल्याचे सांगितले. तो पर्यंत सर्व काही आगीत जळाले होते. चिमुकल्या रुपेश चा देखील या आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.