सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत 3 वर्षाचा चिमुकला गटारात पडला, शोध सुरु

मुंबईच्या गोरेगावर येथील आंबेडकर नगर परिसरात घराबाहेरील उघड्या गटरात तीन वर्षाचा चिमुकला पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना बुधवार रात्री साडे दहाच्या सुमारास घडली असून अजूनही बचाव पथक चिमुकल्याचा शोध घेत आहे.
 
पालिका कर्मचारी, पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान बुधवारी रात्रीपासून या मुलाचा शोध घेत आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून यासाठी पालिका जवाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
 
काल रात्री येथे मुसळधार पाऊस सुरू होता. चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला आणि अंधार असल्याने चुकून उघड्या गटरात पडला. त्यातून तो वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. ही घटना शेजारच्या दुकानाबाहेर लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली.
 
या चिमुकल्याचा रात्रीपासून शोध सुरू आहे. चिमुकला सापडत नसल्याने या मुलाच्या आई-वडील आणि नातेवाईकांचे हाल होत आहे.

फोटो: सांकेतिक