गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (07:59 IST)

जळगाव मनपाचे ४ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

4 corporators of Jalgaon Corporation again in Shiv Sena
जळगाव शहर मनपातील काही नगरसेवकांनी भाजपशी बंडखोरी करून शिवसेनेशी घरोबा केला होता. काही दिवसांपूर्वी पुन्हा काही नगरसेवकांनी घरवापसी करीत बांधली होती. दरम्यान, मनपातील शिवसेनेचे बहुमत कमी झाल्याने चिंता वाढली होती. सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असून ४ नगरसेवकांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
जळगाव मनपात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या इकडून-तिकडे उड्या सुरूच असून नागरिक संभ्रमात आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपत गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.
 
पुन्हा भाजपात गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी सभागृह नेते ललित कोल्हे हे प्रयत्नशील होते. बंडखोर नगरसेवकांच्या ते कायम संपर्कात होते. अखेर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली असून चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. शुक्रवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधले आहे.