मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :बुलडाणा , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (12:00 IST)

अपघातात शेगावला देवदर्शनासाठी जाणाऱ्या 5 भाविकांचा मृत्यू

accident
बुलडाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. यात शेगावला देवदर्शनासाठी जाणाऱ्या 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींवर देऊळगाव राजा आणि जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
 
एकापाठोपाठ झालेल्या भीषण अपघातांनी अपघातांनी पुरता हादरून गेला आहे. सोलापूरमध्ये पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला ट्रकनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. तर बुलढाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. त्यासोबतच परभणीच्या चारठाणा परिसरात एकाच दुचाकीवरुन पाचजणांना प्रवास करणं त्यांच्या जीवावर बेतलं आहे.