1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सांगली , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:56 IST)

हसन मुश्रीफ भर कार्यक्रमात म्हणाले, बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत…

hasan mushrif
राज्यात महाविकास आघाडीचे  सरकार येऊन अडीच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. विरोधकांनी अनेक वेळा हे आघाडीचे सरकार पडण्याची भविष्यवाणी केली होती मात्र आजही महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित पणे कामकाज चालवताना दिसत आहे. महाविकास आघडी मधील नेत्यानं मध्ये अनेक वेळा कुरबुरी होतात. तसेच हा पक्षातील श्रेष्ठ नेत्यांपर्यंतही जातो. त्यावेळी विरोधकांना आघाडी सरकारवर टीका करण्याचे कारण देखील सापडत असते.
 
अशातच हसन मुश्रीफ यांच्या हस्ते इस्लामपूर  मधील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत असे वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र मात्र हसू पिकले. थोडावेळापुरते वातावरणात आनंद दिसून आला.
 
हसन मुश्रीफ यांनी २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आठवण करून दिली. यावेळी ते म्हणाले अनेकांना विधानसभा निवडणुकीनंतर असे वाटले की आमी सत्तेत येणार नाही. मात्र त्यांना असे वाटत असताना आम्ही सत्तेत कसे आलो याचे उदाहरण देखील दिले.