रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (17:24 IST)

जवान चंद्रशेखर भोंडे अनंतात विलीन

भंडाऱ्या जिल्ह्यातील  अपघातात निधन झालेले 21 महार रेजिमेंट चे जवान चंद्रशेखर भोंडे आज अनंतात विलीन झाले.त्यांना संदीप देखील म्हणत होते . त्यांच्यावर भंडारा येथे शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. चंद्रशेखर भोंडे  हे जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांचा वाहनाला अपघात झाला होता. त्यामध्ये चंद्रशेखर यांच्यासह पाच जवान जखमी झाले होते. सर्व जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान चंद्रशेखर यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, चार वर्षाचा मुलगा, आहे. नुकतेच ते आपली 75 दिवसांची सुट्टी संपवून 5 मार्च रोजी कामावर रुजू होण्यासाठी काश्मीर ला निघाले. परंतु अपघातातच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी भंडाऱ्यात आणण्यात आले. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह गावकरी मोठ्या संख्येत आले होते. त्यांच्या निधनाने भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.