शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (16:46 IST)

विजेच्या धक्क्याने चिमुकल्यांचा दुर्देवी अंत

बीडच्या माजलगाव तालुक्यात टालेवाडी भागात घराच्या छतावर विजेचा प्रवाह होऊन करंट लागून दोन चिमुकल्यांचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली आहे. माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथे भरत बडे यांच्या घराच्या छतावर खेळत असताना घराच्या जवळ लागलेल्या डीपी वरून छतामध्ये विजेचा प्रवाह उतारला आणि त्यात करंट लागून दोन सख्खे चुलत भाऊ बहीण यांचा मृत्यू झाला. साक्षी भरत बडे(12) आणि सार्थक अशोक बडे असे या मयत चिमुकल्यांनी नावे आहे. या घटने मुळे बडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
 
डीपीमधून करंट उतरत असल्याच्या तक्रारी वीज विभागच्या अधिकाऱ्यांकडे करून देखील यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. असा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील दोन हसरे चेहरे कायमचे शांत झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.