बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (11:01 IST)

उसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला

साताऱ्यात पसरणी तालुका वाई येथे भैरवनाथ नगरला उसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाहीत. पण या अपघातात ऊस आणि वाहतूक करणाऱ्या ट्रॅक चे मोठे नुकसान झाले आहे. रास्ता अरुंद असल्याने ट्रक चे चाक खड्यात अडकले आणि ट्रॅक एकाबाजूने कलंडला. ट्रक चालकाने आपल्यापरीने ट्रकला वाचविण्याचे प्रयत्न केले पण तो अपयशी ठरला. भैरवनाथनगर पसरणी येथे उसाची तोड सुरु असता ऊस तोडून झाल्यावर हा ट्रक उसाला घेऊन साखर कारखान्याकडे जात असता धोम धरण्याच्या कालव्यात ट्रकचे चाक खड्यात अडकून ट्रक कालव्यात कोसळला. सुदैवाने या मध्ये कोणती जीवित हानी झाली नाही. पण ट्रकचे आणि उसाचे आर्थिक नुकसान झाले.