सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (14:13 IST)

हरवलेल्या कुत्रा शोधून आणून देणाऱ्याला हजारोचे बक्षीस

आपल्या घरातील सदस्य बेपत्ता झाल्यावर आपला जीव कासावीस होतो. आपण त्याला शोधण्यासाठी सर्व काही करतो. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतो. वर्तमान पत्रात जाहिरात देतो. सोशल मीडियावर पोस्ट टाकतो. आणि शोधून आणून देणाऱ्याला बक्षीस देण्याचे देखील जाहीर करतो. जेणे करून आपल्या पासून दुरावली व्यक्ती किंवा हरवलेली व्यक्ती आपल्याला पुन्हा सापडेल. आपण हे सर्व आपल्या माणसांसाठी करणे हे सामान्य आहे. पण जर असच काही आपल्या आवडत्या प्राण्यांविषयक असल्यास जरा आश्चर्याची बाब आहे. असे काही घडले आहे चंद्रपूर येथे. 
 
हरवलेल्या कुत्र्याच्या शोध लावून त्याला घरी आणून देणाऱ्याला त्या कुत्र्याच्या मालकाने 50 हजाराचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. या मालकाचे नाव  डॉ.दिलीप कांबळे असून ते मूळचे नागपूरचे आहे. 'जोरू' हे त्यांच्या हरवलेल्या कुत्र्याचे नाव आहे. लेब्राडोर जातीचा हा कुत्रा त्यांच्या कडे जोरू 1 महिनाचा असताना आला होता.जोरूचा सांभाळ कांबळे कुटुंबीयांनी खूपच प्रेमाने केला. त्यांना जोरूचा एवढा लळा लागला की जोरू त्यांच्या कुटुंबाचा एक भागच बनला. तो दररोज सकाळी बाहेर फिरायला जायचा आणि एक दीड तासानंतर परत घरी यायचा अशी सवयच त्याला लावलेली होती.   
 
दररोज प्रमाणे 24 फेब्रुवारी रोजी कुटुंबीयांनी त्याला बाहेर फिरायला सोडले बराच वेळ झाल्यावर जोरू परत आला नाही. कांबळे कुटुंबीय त्याची शोधाशोध करायला निघाले. जोरू हा मनमिळावू स्वभावाचा होता. कोणाकडे सहज जाण्याची त्याची वृत्ती होती. त्याचा खूप शोध घेतल्यावर देखील त्याचा पत्ता लागला नाही. त्यांनी जोरूला कोणी चोरल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी जोरूला शोधून आणून देणाऱ्याला 50 हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी या संदर्भात पोस्ट देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांच्या या जाहिरातीची चर्चा चंद्रपुरात होत आहे.