1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2024 (12:28 IST)

धुळवडीच्या दिवशी मुंबईत 5 विद्यार्थी बुडाले

water death
होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. धुळवड यंदा 25 मार्च रोजी साजरी केली.धुलिवंदनच्या दिवशी मुंबईच्या माहीम समुद्रात पाच महाविद्यालयीन विध्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे विद्यार्थी माहीमच्या समुद्राच्या किनाऱ्यावर आलेले पाच महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाले तर या मधील 4 जणांना वाचविण्यात यश आले तर एक विद्यार्थी पाण्यात बुडाला असून त्याचे नाव यश कांगडा असून त्याचा शोध अद्याप लागला नाही. 

हे सर्व जण महाविद्यालयीन विध्यार्थी असून हे कसे काय बुडाले त्याचा शोध घेतला जात आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, हे पाच ही जण धूलिवंदनच्या दिवशी माहीमच्या समुद्रकिनारी आले असता पाच ही जण पाण्यात बुडू लागले. जवळपास च्या लोकांनीही चौघांना वाचवले मात्र एक मुलगा पाण्यात बुडाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौघाना रुग्णालयात पाठवले एकाचा शोध लागू शकला नाही. उपचाराधीन असलेल्या दोघांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. तर उपचाराधीन असलेल्या दोघांपैकी एकाची प्रकृती  चिंताजनक आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून  प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 
 
 Edited by - Priya Dixit