गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (09:11 IST)

लातूरमध्ये गर्ल्स हॉस्टलच्या जेवणातून 50 विद्यार्थिनींना विषबाधा

Maharashtra News
लातूर मधील गर्ल्स हॉस्टेलमध्ये रात्री जेवण केल्यानंतर 50 विद्यार्थिनींची तब्येत अचानक बिघडली तसेच फूड पॉइजनिंग झाल्यामुळे सर्व विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. अधिकारींनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी या विद्यार्थींनी जेवण केले. त्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडली व काहीजणींना उलट्या व्हायला लागल्या. 
 
सूचना मिळताच कॉलेजचे प्रिंसिपल घटनास्थळी दाखल झालेत. तसेच विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की कमीतकमी 50 विद्यार्थिनींना रुग्णालयामध्ये  दाखल करण्यात आले होते. 20 विद्यार्थिनींना सुट्टी देण्यात आली आहे तर तीस विद्यार्थिनींनवर उपचार सुरु आहे.
 
Edited By- Dhanashri Naik