गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2025 (16:53 IST)

HMPV बाबत देशभरात अलर्ट, मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला लागण

चीनमध्ये HMPV विषाणू वेगाने पसरू लागला आहे. भारतात या विषाणूची लागण झालेल्या 9 रुग्णांची पुष्टी झाली आहे. मुंबईत एका 6 महिन्यांच्या मुलीला संसर्ग झाला होता. 

हा आकडा देशात झपाट्याने वाढत आहे. देशात आतापर्यंत या विषाणूंची लागण लागलेल्या रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. मुंबईत सहा महिन्यांच्या मुलीला 1 जानेवारी रोजी खोकला, छातीत जडपणा जाणवणे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुलीला  HMPV विषाणू ची लागण असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरु केले असून आता मुलीची प्रकृती सुधारली आहे. या पूर्वी नागपुरात 13 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाच्या मुलाला या विषाणूची लागण लागली होती आणि त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले. 
 
यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागासाठी नियमावली तयार केली आहे. यासंदर्भात 3 डिसेंबर आणि 6 डिसेंबर रोजी राज्य सरकारच्या बैठका झाल्या. त्यावेळी या नियमांची माहिती देण्यात आली असून, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांना त्यांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजार होतात. अशक्तपणा, उलट्या, ताप, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हा. अशा रुग्णांची माहिती संकलित करून तातडीने महापालिकेला देण्यात आली आहे.
 
एचएमपीव्ही व्हायरसबाबत पुण्यात खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये नागरिकांनी कशी खबरदारी घ्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात 350 खाटा तयार करण्यात आल्या आहेत. संसर्गजन्य आजारांनी बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे रुग्णालय खास बांधले आहे. त्यामुळे या रुग्णालयात सुव्यवस्था राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकही रुग्ण नसून खबरदारी म्हणून खाटा राखीव ठेवण्याचे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे.
 
Edited By - Priya Dixit