1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 मे 2025 (20:52 IST)

कल्याणमध्ये ४ मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू

कल्याणमधील चांदीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मंगलाराघो नगरमध्ये असलेल्या सप्तशृंगी नावाच्या चार मजली निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. आतापर्यंत या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितनुसार महाराष्ट्रातील कल्याणमध्ये मंगळवारी चांदीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मंगलाराघो नगरमध्ये असलेल्या सप्तशृंगी नावाच्या चार मजली निवासी इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळल्याची एक दुःखद घटना घडली. स्लॅब थेट खाली कोसळला आणि इमारतीच्या खालच्या मजल्यावर राहणारे लोक अडकले. आतापर्यंत या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आणि इमारतीत राहणाऱ्या इतर लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देशही दिले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मदत देण्याचे त्यांनी सांगितले.