मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:50 IST)

Coronavirus : महाराष्ट्रात 6 संशयित रुग्ण

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८० वर जाऊन पोहोचली आहे. भारतातही परदेशातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्रातील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 26 जानेवरीपर्यंत 3 हजार 756 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 
 
आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार रुग्णांना मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात भरती करण्यात आले असून दोन संशयित रुग्णांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
कोरोनो विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये एका स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था केली गेली आहे. कोरोना विषाणूमुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. सर्वप्रथम चीनमध्ये या अज्ञात रोगानं पाय ठेवला. चीनमध्ये आतापर्यंत 2800 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 
घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप असणे हे त्याची प्राथमिक लक्षणे मानली आहे. कोरोना व्हायरसचे संसर्ग बर्‍याच देशात वेगाने पसरत आहे आणि ज्यांना ह्या विषाणूंची लागण झाली आहे ते मरण पावत आहे. 
 
आपण आपल्यापरीने ह्याची काळजी घेऊ शकतो आणि काही उपाय करू शकतो.
आपले हात दिवसातून अनेक वेळा साबण, कोमट पाणी आणि अल्कोहलयुक्त हॅन्ड सेनेटायझरने स्वच्छ करावे.
तोंडाला मास्क लावावे. चांगल्या मास्कचा वापर करावा. घरातून निघण्यापूर्वी मास्क लावूनच निघावे.
आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये.
प्राण्यांपासून लांब राहणे, मीटचे सेवन करणे टाळावे.
गरज असल्यास घरातून बाहेर जाणे.
संक्रमित व्यक्ती पासून लांब राहणे.
बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे.
शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करणे. 
सर्दी खोकल्याने संक्रमित व्यक्तींच्या जवळ न जाणे.
सडके आणि शेतात प्राण्याच्या संपर्कात न जाणे.    
भरपूर विश्रांती घेणे.
भरपूर पेय घेणे.
तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घेणे. 
लहान मुलांना एस्परिन देणे टाळावे.
त्वरित डाँक्टरला दाखवणे. मनाने कोणतेही औषधोपचार घेणे टाळावे. औषधे चिकित्सकांच्या परामर्शानुसारच घ्यावे.